24.4 C
Gondiā
Tuesday, August 11, 2026
Home विदर्भ पालकमंत्र्यांच्या हस्ते साठवण बंधाऱ्याचे भूमीपूजन

पालकमंत्र्यांच्या हस्ते साठवण बंधाऱ्याचे भूमीपूजन

0
30

गोंदिया,दि.२४ : अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील पुष्पनगर येथे २५ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता जलसंधारण विभागाच्या साठवण बंधाऱ्याचे भूमीपूजन पालकमंत्री राजकुमार बडोले हे करतील. अध्यक्षस्थानी खा.नाना पटोले हे असतील. तर विशेष अतिथी म्हणून खा.प्रफुल पटेल, जि.प.अध्यक्ष उषा मेंढे, उपाध्यक्ष रचना गहाणे, तर प्रमुख अतिथी म्हणून पं.स.सभापती अरविंद शिवणकर, माजी जि.प.कृषी व पशूसंवर्धन समिती सभापती उमाकांत ढेंगे, जि.प.माजी बांधकाम समिती सभापती प्रकाश गहाणे, जि.प.सदस्य तेजुकला गहाणे, पं.स.सदस्य अर्चना राऊत, पुष्पनगर सरपंच खोकण सरकार, उपसरपंच सचिन परामी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन लघुसिंचन (जलसंधारण) विभागाचे कार्यकारी अभियंता विलास निखारे यांनी केले आहे.