24.2 C
Gondiā
Sunday, August 30, 2026
Home विदर्भ वणी येथे साहित्य अकादेमीतर्फे ‘युवा साहिती’ कविसंमेलन

वणी येथे साहित्य अकादेमीतर्फे ‘युवा साहिती’ कविसंमेलन

0
8

सोमवारी (ता.३१ ऑगस्ट) लोकमान्य टिळक महाविद्यालयात आयोजन

वणी :साहित्य अकादेमी, नवी दिल्ली, लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी आणि विदर्भ साहित्य संघ, शाखा-वणी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘युवा साहिती’ या विशेष मराठी कविता-वाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, दि. ३१ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता लोकमान्य टिळक महाविद्यालयात हा कार्यक्रम होणार आहे. शिक्षण प्रसारक मंडळ, वणीचे अध्यक्ष विजय मुकेवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत. लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. विदर्भ साहित्य संघ, शाखा-वणीचे अध्यक्ष डॉ. अभिजीत अणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. साहित्य अकादेमी, नवी दिल्लीचे सामान्य परिषदेचे सदस्य डॉ. प्रमोद मुनघाटे स्वागतपर मनोगत व्यक्त करतील.

या कविता-वाचन कार्यक्रमात पुनीत मातकर (यवतमाळ), मिनाक्षी गोरंटीवार (वणी), अविनाश पोईनकर (चंद्रपूर), गीता रायपुरे (चंद्रपूर) आणि दिलीप अलोणे (वणी) हे कवी सहभागी होऊन आपल्या कवितांचे वाचन करणार आहेत. मराठी कवितेतील नव्या संवेदना, समकालीन आशय आणि युवा कवींच्या सर्जनशील अभिव्यक्तीला व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. साहित्यप्रेमी, विद्यार्थी, शिक्षक आणि रसिकांनी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.