गोंदिया: गुदमा-प्रताप बाग या नवीन रेल्वे मार्गासाठी संपादित केल्या जाणाऱ्या जमिनींना अत्यंत कमी मोबदला देणे आणि प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणाविरोधात ‘किसान जमीन बचाओ संघर्ष समिती’च्यावतीने आज ७ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२:०० वाजता कटंगी नाका, बालाघाट रोड, गोंदिया येथे ‘रास्ता रोको’ आंदोलनाला सुरवात करण्यात आली आहे.गोंदिया-बालाघाट राज्यमार्गावर कटंगीनाका येथे हे आंदोलन महापुरुषांच्या प्रतिमेला माल्यार्पण केल्यानंतर सुरु करण्यात आले.या आंदोलनामुळे वाहतुकीची कोंडी होऊ नये याकरीता पोलीस प्रशासनाने बालाघाट टी पाॅंईटवरच वाहतूक अडवून इतर मार्गाने वळविली तर कटंगी नाक्याआधी वाहतुक अडवून नागरामार्गे रवाना करण्यात येत आहे.मात्र मोठी वाहने ही आंदोलनामुळे मुख्य मार्गावरच थांबवली जात असल्याचे दिसून आले.
संघर्ष समितीच्यावतीने अखिलेश सेठ,प्रा.अमित बुध्दे,राजेश नागरीकरआयोजित पत्रकार परिषदेत या रास्ता रोको आंदोलनाबाबत अखिलेश सेठ, प्रा. अमित बुद्धे, राजेश नागरीकर,नंदुभाऊ बिसेन, कार्तिक चव्हाण, मोहिनी वराडे, गोल्डी गावंडे, गोपाळ चुटे, श्याम बुद्धे, छोटू बुद्धे, सुप्रित बैस, रसिक पटेल,गुड्डू मिश्रा,पुजा सेठ,हंसराज लिल्हारे,नानु चिखलोंढे,विष्णु नागरीकर,सचिन रहागंडाले यांच्यासह अनेक शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते.आंदोलनस्थळी आंदोलकांनी भजन गात आणि काळे रुमाल किंवा काळ्या फिती बांधून शांततापूर्ण मार्गाने आंदोलन सुरु ठेवले आहे. आंदोलनात कटंगी कला, नागरा हलबी टोला, सावरी, गर्रा, गोंदिया खुर्द, पोवारी टोला, दतोरा, खमारी, चुलाद यासह १२ गावांतील शेतकरी सहभागी झाले आहेत.




