नागपूरच्या एजंसीला दिले कंत्राट मालमत्तांना क्रमांक देण्यापासून झाली सुरूवात, उत्पन्न वाढविण्यास मदत होणार
गोंदिया : शहरातील ालमत्तांचे मागील कित्येक र्षांपासून कर निर्धारण असेसमेंट) झाले नसल्याने ालमत्ता कराच्या माध्यमातून नळणाऱ्या मोठ्या महसुलाला गर परिषदेला मुकावे लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन नगर रिषदेने मालमत्ता कर नर्धारणाचे काम हाती घेतले सून, सोमवारपासून (दि. ८) या बामाला सुरुवात करण्यात आली आहे. नागपूर येथील एजन्सीला कामाचे कंत्राट देण्यात आले हे.
नगर परिषदेचा कारभार चालविण्यात मालमत्ता करातून येणाऱ्या रकमेचा महत्त्वाचा वाटा असतो. मात्र गोंदिया नगर परिषद नेमकी याच रकमेला वंचित आली असून ही बाब आता नगर परिषद प्रशासनाच्या लक्षात आली आहे. अशात नगर परिषदेने शहरातील मालमत्तांचे कर निर्धारण करण्याचा निर्णय सर्व साधारण सभेत घेतला व त्यानुसार निविदा मागविण्यात आल्या होत्या. यात नागपूर येथील कोलब्रो प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला मालमत्ता कर निर्धारणाचे कंत्राट देण्यात आले आहे. या कंपनीने सोमवारपासून (दि. ८) आपल्या कामाला सुरुवात केली आहे.
कंपनीला ९ महिन्यांचा कालावधी मालमत्तांचे कर निर्धारण करण्यासाठी देण्यात आला आहे. शहरात नगर परिषदेच्या रेकॉर्डवर आजघडीला ४६ हजार ३१८ मालमत्ता आहेत. मात्र मागील कित्येक वर्षापासून त्यांचेही कर निर्धारण झाले नसल्याने मागील कित्येक वर्षांपासून आहे तेवढाच
त्यांच्याकडून घेतला जात आहे. आता शहरीकरणासह शहराची लोकसंख्या वाढली असून सहजीकच मालमत्ता वाढल्या असतील यात शंका नाही. कर पालिकेला नोंद आहे तेवढ्याच मालमत्तांकडून कर घेता येत आहे. मात्र आता हे कर निर्धारण झाल्यानंतर नव्याने उभ्या मालमत्ता रेकॉर्ड येणार व पालिकेच्या तिजोरीत आवक वाढणार यात शंका नाही.
सुमारे १,२०० रुपये दराने कंत्राट
नगर परिषदेने कोलब्रो कंपनीला सुमारे १, २०० रुपये प्रत्येकी या दराने कंत्राट दिल्याची माहिती आहे. आता मालमत्तांना क्रमांक दिले जात असून त्यासाठी कंपनीचे २५ कर्मचारी आले आहेत. यानंतर मोजणी व अन्य कामे वाढताच कर्मचाऱ्यांची संख्याही कंपनीकडून वाढविली जाणार आहे. कंपनीला या कामासाठी ९ महिन्यांचा कालावधी देण्यात आल्याची माहिती आहे.





