26.6 C
Gondiā
Tuesday, September 15, 2026
Home विदर्भ वाघाच्या हल्ल्यात झुरकुटोला येथील ७२ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

वाघाच्या हल्ल्यात झुरकुटोला येथील ७२ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

0
22

सडक अर्जुनी:तालुक्यातील नागझिरा अभयारण्याला लागून असलेल्या एफडीसीएम (FDCM) कंपार्टमेंट ५२४च्या जंगल परिसरात वाघाने केलेल्या भीषण हल्ल्यात एका वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज १५ सप्टेबंरला घडली.वातू बकाराम राऊत (वय ७२, रा. झुरकुटोला, तालुका सडक अर्जुनी) असे मृत वृद्धाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून वनविभागाने तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.मिळालेल्या प्राथभिक माहितीनुसार, बकाराम राऊत हे बकऱ्यांसाठी चारा आणण्यासाठी जंगलात गेले होते. याचदरम्यान त्यांच्यावर वाघाने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.घटनेची माहिती मिळताच PRT टीम झुरकुटोला घटनास्थळी पोहोचली. पथकाने परिस्थितींची माहिती संबंधित वनविभागाला तातडीने दिली. त्यानंतर वनविभागाच्या अधिकान्यांकडून घटनास्थळी पाहणी, पंचनामा करण्याची प्रकिया सुरु आहे.