26.6 C
Gondiā
Tuesday, September 15, 2026
Home विदर्भ गरजू व्यक्तीला कुबडी भेट देत जनसेवेचा संदेश

गरजू व्यक्तीला कुबडी भेट देत जनसेवेचा संदेश

0
4

गोंदिया। गरजू व दिव्यांग नागरिकांना मदत करण्याच्या उद्देशाने जनता के आमदार श्री. विनोदजी अग्रवाल यांच्या कार्यालयात एका गरजू व्यक्तीला कुबडी भेट देण्यात आली.गोंदिया विधानसभा क्षेत्रातील काटी-बिरसोला येथील रहिवासी रोहित विजय राऊत यांचा काही काळापूर्वी नागरा-कटंगी मार्गावर अपघात झाला होता. या अपघातात त्यांच्या एका पायाला गंभीर दुखापत झाल्याने डॉक्टरांना त्यांचा एक पाय कापावा लागला. त्यामुळे सध्या त्यांना चालताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

त्यांची गरज लक्षात घेऊन साविता अग्रवाल, गोंदिया विधानसभा प्रमुख छत्रपाल तूरकर, भाजपा जिल्हा सचिव अशोक जयसिंघानी, माजी नगरसेवक सतीश मेश्राम, भाजपा NGO आघाडी जिल्हा संयोजक विनोद चांदवानी (गुड्डू) तसेच आनंद कालोया यांच्या हस्ते रोहित विजय राऊत यांना कुबडी भेट देण्यात आली.यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, गरजू व्यक्तींना मदत करणे तसेच त्यांना स्वावलंबी होण्यासाठी सहकार्य करणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. अपघातानंतर कठीण परिस्थितीतून जात असलेल्या रोहित राऊत यांना दैनंदिन जीवनात काही प्रमाणात सुविधा मिळावी, या उद्देशाने ही मदत करण्यात आली.जनसेवाच खरी सेवा असून, गरजेच्या वेळी एखाद्याच्या मदतीला धावून जाणे हाच मानवतेचा खरा परिचय आहे.