26.1 C
Gondiā
Wednesday, September 16, 2026
Home रोजगार/व्यापार ‘लॉयड्स’च्या विस्तारीकरणाला महावितरणच्या वीजपुरवठ्याचे बळ; संचालक औंढेकर यांची ग्वाही

‘लॉयड्स’च्या विस्तारीकरणाला महावितरणच्या वीजपुरवठ्याचे बळ; संचालक औंढेकर यांची ग्वाही

0
22

नागपूर, दि. 16 सप्टेंबर 2026: लॉयड्स मेटल्स अॅण्ड एनर्जी लिमिटेडच्या भविष्यातील विस्तारीकरणाच्या योजनेसाठी मागणीप्रमाणे वाढीव भारासह दर्जेदार वीजपुरवठा उपलब्ध करून दिला जाईल. तसेच तत्पर वीजसेवेसाठी कायमच प्राधान्य दिले जाईल अशी ग्वाही महावितरणचे संचालक (संचालन) धनंजय औंढेकर यांनी दिले.

जिल्ह्यातील कोन्सारी (ता. चार्मोशी) येथील लॉयड्स मेटल्समध्ये संचालक धनंजय औंढेकर यांनी शनिवारी (दि. 15) भेट दिली व वीजपुरवठ्याबाबत कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. लॉयड्स कंपनीच्या सुरजागड (खाणकाम) आणि कोन्सारी (प्रक्रिया प्रकल्प/स्टील प्लांट) या दोन्ही प्रकल्पांना महावितरणकडून स्वतंत्र दोन वीजजोडण्यांद्वारे 72 एमव्हीए क्षमतेचा वीजपुरवठा करण्यात येत आहे. या भेटीत संचालक औंढेकर यांनी कंपनीमधील वीजपुरवठ्याचा आढावा घेतला व संबंधित यंत्रणेची पाहणी केली. लॉयड्स कंपनीकडून भविष्यात प्रकल्प विस्तारीकरणाची योजना आहे. त्यासाठी महावितरणकडून मागणीप्रमाणे विजेचा भार व पुरवठा उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही औंढेकर यांनी दिली.

यावेळी मुख्य अभियंता हरिश गजबे, अधीक्षक अभियंता प्रकाश खांडेकर, लॉयड्स कंपनीच्या इलेक्ट्रिकल आणि इन्स्ट्रुमेंटेशन विभागाचे वरिष्ठ महाव्यवस्थापक (संचालन) अरिंदम चंदा व अमूल्य साबत (प्रकल्प), उपमहाव्यवस्थापक एस. प्यारे लाल (संचालन), वरिष्ठ व्यवस्थापक राहुल रामगिरवार (प्रकल्प), व्यवस्थापक शुभम कुमार (प्रकल्प), विभागप्रमुख (प्रशासन) वेणू गोपाळ, कार्यकारी अभियंता जितेंद्र वाघमारे आदींची उपस्थिती होती.