26.1 C
Gondiā
Wednesday, September 16, 2026
Home गुन्हेवार्ता गोंदियात LCBची धडक कारवाई; अवैध वाळू वाहतूक करणारे ८ आरोपी अटकेत, ५०.७२...

गोंदियात LCBची धडक कारवाई; अवैध वाळू वाहतूक करणारे ८ आरोपी अटकेत, ५०.७२ लाखांचा मुद्देमाल जप्त

0
4

गोंदिया:जिल्ह्यात अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धडक कारवाई करत धडाकेबाज कामगिरी केली आहे. गोंदिया पोलिसांच्या पथकाने १४ ते १६ सप्टेंबर २०२६ दरम्यान विविध ठिकाणी नाकाबंदी करून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ८ आरोपींना ताब्यात घेतले. या कारवाईत ७ ब्रास वाळू, ५ ट्रॅक्टर आणि १ टिप्पर असा एकूण ₹५०,७२,००० (५० लाख ७२ हजार रुपये) चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या निर्देशानुसार आणि एलसीबीचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

सदरची यशस्वी कामगिरी पोलीस हवालदार संजय चव्हाण, सोमेंद्रसिंग तूरकर, रियाज शेख, दीक्षितकुमार दमाहे, सुबोध बिसेन, इंद्रजित बिसेन, तुळशीदास लुटे, दुर्गेश तिवारी, तसेच पोलीस शिपाही छगन विठ्ठले, सुनील डहाके, निखिल मेश्राम, राकेश इंदूरकर आणि विलेश ठाकरे यांच्या पथकाने केली आहे.अवैध धंद्यांवर यापुढेही कठोर कारवाई जारी राहील, असा इशारा गोंदिया पोलीस प्रशासनाने दिला आहे.blank

🚨 ३ दिवसांत ३ ठिकाणी झालेली मोठी कारवाई:

१. दवनीवाडा पोलीस स्टेशन हद्द (१४ सप्टेंबर २०२६):

महालगाव ते रतनारा मार्गावर नाकाबंदीदरम्यान वैनगंगा नदीच्या पात्रातून चोरटी वाळू वाहतूक करणारे २ ट्रॅक्टर पकडण्यात आले.

  • जप्त मुद्देमाल: २ ट्रॅक्टर (ट्रॉलीसह) व २ ब्रास वाळू (एकूण किंमत ₹१५,१२,०००).

  • कारवाई केलेले आरोपी: राजकुमार नैताम नागपुरे (३०, रा. महालगाव) आणि जितेंद्र तिलकचंद ठाकरे (४४, रा. देवरी).

२. रावणवाडी पोलीस स्टेशन हद्द (१५ सप्टेंबर २०२६):

तेढवा ते काटी रोडवर नाकाबंदी करून तेढवा व डांगुर्ली घाटातून अवैध वाळू वाहतूक करणारे १ ट्रॅक्टर आणि १ टिप्पर जप्त करण्यात आले.

  • जप्त मुद्देमाल: १ ट्रॅक्टर, १ टिप्पर व ३ ब्रास वाळू (एकूण किंमत ₹२१,१८,०००).

  • कारवाई केलेले आरोपी: खिलेंद्र रामकिशोर म्हात्रे (२९, रा. मरारटोला), प्रदीप खुशाल भुरे (२२, रा. पांढराबोडी), राहुल राजू उईके (२५, रा. सलाईटोला) आणि यश राधेश्याम लिल्हारे (रा. गद्दाटोली, गोंदिया).

३. डुग्गीपार पोलीस स्टेशन हद्द (१६ सप्टेंबर २०२६):

सलाईटोला ते चिरचाळी मार्गावर उमरझरी नाल्यातून चोरटी वाळू वाहतूक करणारे २ ट्रॅक्टर पकडण्यात आले.

  • जप्त मुद्देमाल: २ ट्रॅक्टर ट्रॉलीसह व २ ब्रास वाळू (एकूण किंमत ₹१२,१२,०००).

  • कारवाई केलेले आरोपी: आशिष राजकुमार राऊत (२८, रा. डव्वा) आणि मेघनाथ सखाराम उंदीरवाडे (५३, रा. डव्वा, ता. सडक अर्जुनी).

📊 जप्त मुद्देमालाचा थोडक्यात तपशील

साहित्य प्रमाण एकूण मूल्य
वाळू ७ ब्रास ₹४२,०००
ट्रॅक्टर (ट्रॉलीसह) ५ नग ₹४५,०००,००
टिप्पर १ नग ₹१५,००,०००
एकूण जप्ती ₹५०,७२,०००