24.4 C
Gondiā
Sunday, August 16, 2026
Home राष्ट्रीय देश वटहुकूम जारी, जुन्या नोटा बाळगल्यास मोठा दंड!

वटहुकूम जारी, जुन्या नोटा बाळगल्यास मोठा दंड!

0
25

नवी दिल्ली,(वृत्तसंस्था) दि. 28 – चलनातून रद्द करण्यात आलेल्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा असलेल्यांवर आता दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. जुन्या नोटांसंदर्भातील वटहुकूम जारी करण्यात आला आहे. 10 पेक्षा जास्त जुन्या नोटा असल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे तसंच 4 वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. नियमांचा भंग केल्यास किमान 50 हजार किंवा सापडलेल्या रकमेच्या पाचपट रक्कम दंड म्हणून भरावा लागण्याची शक्यता आहे.