25.8 C
Gondiā
Sunday, August 16, 2026
Home Top News बेकरीला आग, सहा जणांचा होरपळून मृत्यू

बेकरीला आग, सहा जणांचा होरपळून मृत्यू

0
32

पुणे,वृत्तसंस्था दि. 30 – पुण्यातील कोंढवा बुद्रुक परिसरात असलेल्या एका बेकरीला आग लागून सहा जणांचा मृत्यू झाल्याचे समजते.मिळालेल्या माहितीनुसार, कोंढवा बुद्रुक येथील तालाब कंपनीजवळील असलेल्या बेक्स अॅन्ड केक्स बेकरीला पहाटेच्या सुमारास आग लागली. या आगीत बेकरीमध्ये झोपलेल्या सहा कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. बेकरीला आग लागल्याचे समजताच अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या आणि आगीवर ताबा मिळविला.
दरम्यान, ही आग शार्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून या बेकरीला बाहेरुन कुलूप लावले होते. त्यामुळे कामगार आत अडकल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.