गोंदिया:- आज झालेल्या नगर परिषदेच्या निवडणूकीत प्रभाग क्र. १८ मधून निवडून आलेले राष्टÑवादी काँगे्रसचे नगर सेवक विजय रगडे यांच्या मिरवणूकीवर काँग्रेसचे पराभुत उमेदवार अफझल शहा उर्फ छन्नू च्या काही कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याने तलाव निर्माण झाले होते. या घटनेमुळे बाजार परीसरात तणावाचे वातावरण निर्माण होउन व्यापा-यांनी दुकाने बंद केले० या प्रकरणात दोन-तिघांना ताब्यात घेण्यात आले असून वातावरण शांत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक डी. आर. शुक्ला यांनी सांगितले.





