25.8 C
Gondiā
Thursday, July 16, 2026
Home मराठवाडा/खान्देश नटराजन चंद्रशेखरन बनले टाटा सन्सचे अध्यक्ष

नटराजन चंद्रशेखरन बनले टाटा सन्सचे अध्यक्ष

0
30

मुंबई, दि. 12 – टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक नटराजन चंद्रशेखरन यांची टाटा सन्सच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. विशेष म्हणजे टाटा सन्सला पहिल्यांदाच पारशी नसलेला व्यक्ती अध्यक्ष म्हणून लाभला आहे.

53 वर्षीय चंद्रशेखरन हे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. टीसीएस 2009पासून भारतातील सर्वात मोठी आउटसोर्सर कंपनी आहे. सायरस मिस्त्रींनी ऑक्टोबरमध्ये राजीनामा दिल्यानंतर टाटा सन्सच्या संचालकपदी नटराजन चंद्रशेखरन यांची नियुक्ती करण्यात आली होती. याचदरम्यान टीसीएसचा तिसऱ्या तिमाहीतला नफा जाहीर झाला. त्यामध्ये टीसीएसने 6778 कोटींचा निव्वळ नफा मिळवला आहे. दरम्यान, टाटा सन्सचे मुख्यालय मुंबई हाऊस येथे आज संचालक मंडळाची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत नटराजन चंद्रशेखरन यांची टाटा सन्सच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यावर संचालक मंडळाचं एकमत झालं आणि नटराजन चंद्रशेखरन अध्यक्ष झाले.