24.8 C
Gondiā
Friday, July 17, 2026
Home विदर्भ मारेगावात ५० विद्यार्थ्यांना विषबाधा

मारेगावात ५० विद्यार्थ्यांना विषबाधा

0
24

वणी, दि. 12 – मारेगाव येथील चिंधुजी पुरके आदिवासी माध्यमिक आश्रमशाळेतील तब्बल ५० विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या विद्यार्थ्यांना उपचारासाठी मारेगाव येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांना उपचारानंतर सुटी देण्यात आली, अजूनही २० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत. हे सर्व विद्यार्थी पाचवी ते दहाव्या वर्गात शिकणारे आहेत. गुरूवारी सकाळी १० वाजता जेवण केल्यानंतर सर्व विद्यार्थी वर्गात बसले. मात्र या विद्यार्थ्यांना अचानक उलट्या आणि मळमळ सुरू झाली. त्यामुळे आश्रमशाळा प्रशासन हादरून गेले. लगेच या विद्यार्थ्यांना मारेगावच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले.