29.1 C
Gondiā
Monday, August 10, 2026
Home राष्ट्रीय देश खासदाराच्या निधनामुळे अर्थसंकल्प सादरीकरणाबाबत प्रश्नचिन्ह

खासदाराच्या निधनामुळे अर्थसंकल्प सादरीकरणाबाबत प्रश्नचिन्ह

0
29

नवी दिल्ली, दि. 1 – केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आज संसेदत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मात्र अर्थसंकल्प सादर होणार की नाही? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. कारण मंगळवारी रात्री खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री ई अहमद यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
यामुळे अर्थसंकल्प सादरीकरणाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. दरम्यान, अर्थसंकल्प सादरीकरण पूर्णपणे रद्द करणे किंवा अर्थसंकल्प सादर करुन पुढील कामकाज स्थगित करणे, असे दोन पर्याय केंद्र सरकारकडे आहेत. मात्र अर्थसंकल्प सादर करण्याबाबतचा अंतिम निर्णय लोकसभा अध्यक्ष घेतील.