नूतन शाळेचा संयुक्त क्रीडा महोत्सव उत्साहात

0
25

गोंदिया,दि.4 –श्री राष्ट्रीय शिक्षण संस्थेव्दारे संचालित नूतन विद्यालय, कमलाकरराव केशवराव इंगळे कनिष्ठ महाविद्यालय व नूतन इंग्रजी शाळेचा संयुक्त क्रीडा महोत्सव नुकताच पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव अमृत इंगळे होते. यावेळी नगराध्यक्ष अशोक इंगळे, माजी खा. डॉ. खुशाल बोपचे, माजी जि.प.अध्यक्ष नेतराम कटरे,विनोद अग्रवाल, डॉ. सचिन बोरडे, अजय इंगळे, डॉ. हरीश र्शोते, यादोराव बोरकर, अश्‍विनी केंद्रे, ज्योती बिसेन, बी.डी. बिसेन, दुर्गासिंह ठाकूर, लिखेंद्र बिसेन, गणेश हेमणे, योगराज रहांगडाले, आकाश गुप्ता, भाग्यश्री मार्कंडेय, विनोद रावते, जी. आर. कापगते, संजय इंगळे प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला एस.एस.ठाकूर व एफ.आर. परिहार यांच्या मार्गदर्शनात आरएसपीच्या विद्यार्थ्यांनी आदित्य भगत यांच्या नेतृत्वात संचलन केले.तसेच राज्यस्तरीय खेळाडू शारदा येडे हिच्या हस्ते क्रीडा ज्योत मैदानात फिरविण्यात आली. दरम्यान उपस्थित मान्यवरांनी समयोचित मार्गदर्शन करून शालेय अभ्यासासोबत विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासात शालेय क्रीडा व स्नेहसंमेलनाचे महत्व सांगितले. तसेच विद्यार्थ्यांनी स्पर्धा व परीक्षेच्या शुभेच्छा दिल्या.या वेळी नवनिर्वाचित नगराध्यक्ष अशोक इंगळे यांचे शाळेतर्फे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.त्यानंतर विविध सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. आयोजनासाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी सहकार्य केले