
गोंदिया,berartimes.comदि.०९-गोंदिया भंडारा जिल्ह्याचे स्वनामधन्य नेते मनोहरभाई पटेल यांच्या १११ व्या जंयतीनिमित्त आज डी.बी.सायंस कॉलेजच्या प्रांगणात पार पडलेल्या सोहळ्यात१४ गुणवंत विद्यार्थीनी विद्याथ्र्यांंचा मनोहरभाई पटेल सुवर्णपदक देऊन बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार,खासदार प्रफुल पटेल व इतर मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
त्यात गुजराती नॅशनल हायस्कुलची दहावीची विद्यार्थिनी होमी दिनेश नागदेवे,दहावीत प्रथम आलेली चंचल अजयअग्रवाल, शांताबेन मनोहरभाई पटेल ज्यु.कॉलेजमधून सर्वाधिक अंक घेणारा पवन रोमेश्वर रहांगडाले, १२ वीत सर्वाधिक अंक मिळविणारा सरस्वती विद्यालय अर्जुनी मोरगावचा किशोर ओंकार काळबांधे, बीए मध्ये प्रथम येणारी एसएस गल्र्स कॉलेजची विद्यार्थिनी शबा कदरीर खा पठान, बी.कॉम मध्ये प्रथम येणारी एन.एम.डी. कॉलेजची विद्यार्थिनी प्रियंका रतनकुमार बजाज, बी.एस.सी. त प्रथम येणारी डी.बी.सायंस कॉलेजची निशा देवानंद खोटेले, अभियात्रिकीमध्ये गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक अंक मिळविणारा मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी सागर भुवन दोनोडे.तर भंडारा जिल्ह्यातून दहावीत सर्वाधिक अंक मिळविणारी नुतन कन्या शाळेची हर्षदा यादवराव परमारे, १२ वीत सर्वाधिक अंक घेणारी नुतन ज्यु.कॉलेजची विद्यार्थीनी केतकी संज़यपदवाड, बीएमध्ये सर्वाधिक अंक मिळविणारी जे.एम.पटेल कॉलेजची विद्यार्थिनी शबा अंजुम अहमद शेख, बी.काम.मध्ये सर्वाधिक अंक घेणारी यशवंतराव चव्हाण कॉलेज लाखांदूरची विद्यार्थिनी रमा माणीक लांडगे, बीएससीत सर्वाधिक अंक मिळविणारी जे.एम.पटेल कॉलेज भंडाèयाची विद्यार्थिनी आरती बालकृष्ण भुरे आणि अभियात्रिकीमध्ये सर्वाधिक अंक प्राप्त करणारी एमआय सहापूरची विद्यार्थिनी प्रियका प्रल्हाद पवार यांना सुर्वणपदकाने सन्मानित करण्यात आले.यावेळी या विद्याथ्र्यांचे पालकही सोबत होते.