समर्थन मुल्यांचे स्वप्न दाखविणाèयानी शेतकèयांना लुबाडले-नितिशकुमार

0
5

गोदिया,berartimes.comदि.०९-: qसचनाशिवाय शेतीचा विकास होऊ शकत नाही,त्याचप्रमाणे शेतकèयांच्या उत्पादन मालाला लागत मुल्य मिळत नाही,तोपर्यंत शेतकèयांचा विकास शक्य नाही.गेल्या तीन वर्षापुर्वी २०१४ च्या निवडणुकीत शेतकèयाच्या उत्पादीत मालावर ५० टक्के नफा जोडून समर्थन मुल्य देण्याचे गाजर दाखविणाèयांनी मात्र आजपर्यंत समर्थन मुल्य दिले नाही.याऊलट कर्जाच्या खाईत घालत त्याना लुबाडल्याचे म्हणत सत्तेसाठी आपण जे सांगितले किमान ते तरी करुन दाखवावे अशी अप्रत्यक्ष टिका बिहारचे मुख्यमंत्री नितिशकुमार यांनी विद्यमान केंद्रातील व राज्यातील सरकारवर केली.
ते गोंदिया-भंडारा जिल्ह्याचे शिक्षणमहर्षी स्व.मनोहरभाई पटेल यांच्या १११ व्या जयंती सोहळ्याचे मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. हा सोहळा गोंदिया शिक्षण संस्थेच्या डी.बी.सायंस कॉलेजच्या पटागंणावर आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय मंत्री खासदार प्रफुल पटेल होते तर अतिथी म्हणून जनता दल (युनायटेड)चे राष्ट्रीय प्रवक्ता माजी खासदार के.सी.त्यागी, माजी खा.पवन वर्मा,उद्योगपती शशी रुईया,भारतीय फुटबॉल टीमचे माजी कर्णधार बाईचुंग भुटीया,माजी मंत्री अनिल देशमुख,आमदार गोपालदास अग्रवाल,माजी आमदार दिलीप बनसोड,नाना पंचबुध्दे,अनिल बावनकर,बंडु सावरंबांधे,रामरतन राऊत,मधुकर कुकडे,विजय शिवणकर,नरेश माहेश्वरी,गोंदिया शिक्षण संस्था व मनोहरभाई पटेल अकादमी अध्यक्षा वर्षा पटेल,गुजरातचे धिरु राजा,भगीरथ पटेल,अजय वडेरा आदी मान्यवर उपस्थित होते.मुख्यमंत्री नितिशकुमार यांच्याहस्ते १३ मुली व ३ मुलांचा मनोहरभाई पटेल सुवर्णपदक देऊन सत्कार करण्यात आला.
पुढे बोलतांना नितिशकुमार म्हणाले की,मनोहरभाई पटेलांनी आपल्या जिवनात केलेला संघर्ष इतरांच्या जिवनात येऊ नये हे लक्षात घेऊन त्यांनी स्वत अशिक्षित राहून इतरांसाठी शिक्षणाची दारे खुली केली.वडीलांनी सुरु केलेल्या शाळांना मुलांने अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि आधुनिक काळातील शिक्षणाला जोडून गोंदिया भंडारा जिल्ह्यातील लाखो विद्याथ्र्यांना उच्चप्रतीचे शिक्षण संस्थेच्या माध्यमातून दिल्याचे गौरवोदगार काढले.सोबतच शिक्षणासह उद्योगक्षेत्राकडे लक्ष देऊन स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचे काम केल्याचे म्हणाले.गोंदिया भंडारा जिल्ह्यातील qसचनाबद्दल बोलतांना भविष्यात हा भाग सुजलाम सुफलाम होणार असून जोपर्यंत शेतकरी सुखी होणार नाही,तोपर्यंत देशाचा विकास शक्य नाही.त्यासाठी कृषीच्या क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि जोडउद्योग व उत्पादीत मालाला समर्थन मुल्य मिळणे आवश्यक आहे.ज्यांना राजकारणाचा संबध नाही असे काही लोक आकाशातून वेळेवर उडी घेऊन संधीचा लाभ घेतात परंतु प्रफुल पटेलांनी स्थानिकपातळीपासून वरच्यापातळीवर राजकारणासोबत समाजकारण केले आहे.झारखंड बिहारसारख्या राज्यात एकच शासकीय सैनिक शाळा आहे,परंतु येथील खासगी सैनिक शाळा बघून शिक्षणात हा परिसर पुढे असल्याचे म्हणाले.आमच्या पाटण्यालाही फ्लार्इंग इस्टीट्युट आहे परंतु येथील फ्लार्इंग इस्टिटयुट हे जागतिक पातळीवर प्रशिक्षण देणारे असल्याचे ते म्हणाले.संचालन माजी आमदार राजेंद्र जैन यांनी केले.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगिताने करण्यात आली.