36.5 C
Gondiā
Monday, June 22, 2026
Home विदर्भ नागपुरात काँग्रेस उमेदवाराच्या घरावर हल्ला

नागपुरात काँग्रेस उमेदवाराच्या घरावर हल्ला

0
19

नागपूर दि. 14 – : नागपुरात कायदे आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. कारण खून, मारामारी, चोरी-दरोड्याच्या घटना रोजच्या झाल्या आहेत.हे चालूच असताना आता मनपा निवडणुकीतील काँग्रेसच्या उमेदवाराच्या घरावर 10 ते 12 अज्ञातांनी हल्ला केला. नागपूरच्या प्रभाग 6 चे उमेदवार कुंदा खोब्रागडे यांच्या घरावर हल्ला झाला. मिलिंदनगरमध्ये काल मध्यरात्री ही घटना घडली.हातात लोखंडी रॉड आणि तलवारी घेतलेल्या टोळीने हा हल्ला केला. या हल्ल्यात तीन जण जखमी झाले आहेत.हल्लेखोरांनी काँग्रेस उमेदवारवर हल्ला केलाच, शिवाय शेजाऱ्यांच्या वाहनांचीही तोडफोड केली.रात्री प्रचार संपवून कुंदा खोब्रागड़े आणि त्यांचे काही कार्यकर्ते घराबाहेर बसले होते. मात्र लांबूनच त्यांना हल्लेखोर दिसले म्हणून उमेदवार आणि काही महिला घरात घुसल्या आणि दार लावून घेतलं.इतर पुरूष कार्यकर्ते घराबाहेरच उभे होते. हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात 3 जण जखमी झाले.याप्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल झाला असून, अद्याप कुणालाही अटक झालेली नाही.