गोंदिया berartimes.com दि.१५-गोंदिया जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या जुर्ले २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीच्यावेळी काँग्रेसने पदाधिकारी बसवितानांच सव्वा सव्वा वर्षाचा कार्यकाळ निश्चित करुन निवड केली होती.त्या अलिखित करारानुसारच गोंदिया पंचायत समितीच्या सभापती स्नेहा गौतम यांनी आपल्या पदाचा राजीनामा १३ फेबुवारी रोजी दिला आहे.
जिल्हा परिषदेमध्ये काही महिन्यापुर्वीच काँग्रेसच्या जि.प.सदस्यांनी आपल्या वरिष्ट नेत्यांना आठवण करुन देण्यासाठी दबावतंत्र वापरले होते.परंतु त्यावेळी विधानपरिषदेच्या निवडणुका लक्षात घेऊन आमदार गोपाल अग्रवालांनी वेळ मारुन नेली होती.आत्ता मात्र नगरपरिषदेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर आता गोंदिया पंचायत समितीच्या सभापतीं स्नेहा गौतम यांना राजीनामा देण्यासाठी गेल्या १५ ते २० दिवसापासून सातत्याने दबाव तयार केला गेला होता.त्या दबावासमोर श्रीमती गौतम यांना झुकावे लागले असून १३ फेबुवारीला त्यांनी गोंदिया पंचायत समितीच्या सभापतीचा राजीनामा सोपविला आहे.गौतम यांच्या राजीनाम्यानंतर गर्रा पंचायत समितीच्या सदस्या श्रीमती हरिणखेडे यांच्या नावाची चर्चा सभापतीपदासाठी सुरु झाली आहे.