ककोडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन

0
8

देवरीŸ,दि.१५: जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्यावतीने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत नक्षलग्रस्त व आदिवासी देवरी तालुक्यातील ककोडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नव्या इमाारतीचे भूमिपूजन आमदार संजय पुराम यांच्या हस्ते जि.प. अध्यक्ष उषा मेंढे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती पी.जी.कटरे, देवरीच्या सभापती देवकीताई मरई, उपसभापती संगीता भेलावे, ककोडीच्या जि.प. सदस्या माधुरी कुंभरे, अल्ताफ हामीद, गणेश सोनभोईर, नरेंद्र मडावी, सविता पुराम, रियाज खान, सुभ्रदा हलामी, प्रमोद संग़ीडवार, अमरदास सोनभोईर, भरत बन्सोड, विरेंद्र अंजनकर आदी उपस्थित होते. सदर आरोगय केंद्राच्या इमारतीचे वास्तुशिल्प हे अत्याधुनिक व आकर्षक स्वरुपात तयार करण्यात आले असून शहरातील खासगी रुग्णालयासारखे दिसणारे ग्रामीण भागातील हे पहिले आरोग्य केंद्र राहणार आहे. आयोजनासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. निमगडे, डॉ. चंदू वंजारे, देवरीचे तालुका वैद्यकीय अधिकारी, उपविभागीय अभियंता सुनील तरोणे यांच्यासह आरोग्य विभागाच्या कर्मचाèयांनी सहकार्य केले.