गोरेगाव,दि.१५: जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाअंतर्गत येणाèया आणि जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती पी.जी.कटरे यांच्य सोनी मतदार संघातील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी व कर्मचाèयांच्या अभावामुळे रुग्णांना त्रास सहन करण्याची वेळ आली आहे. मतदार संघातील आरोग्य केंद्रात पूर्णकाळ वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करुन देण्यात आरोग्य सभापती अपयशी ठरले आहेत. गेल्या आठ महिन्यापासून या आरोग्य केंद्रात एकच वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. त्यातही कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेसाठी नेहमीच जिलह्याच्या भेटीवर राहत असल्याने रुग्णांना योग्य उपचाराअभावी अनेकदा परत जावे लागते. डॉक्टर नसल्याने येथील औषध निर्माता स्वत:च औषधीचे वितरण करीत असल्याचाही प्रकार समोर आला आहे. तर बहुतांश कर्मचारी हे गोंदिया व गोरेगाव येथून ये-जा करीत असल्याने रुग्णालय वाèयावर अशी अवस्था निर्माण झाली आहे. या आरोग्य केंद्रातील दोन कर्मचारी तर चक्क भंडाèयावरुन अपडाऊन करतात. आरोग्य सभापतीकडे अनेकदा सोनी परिसरातील नागरिकांनी पूर्णकाळीन डॉ़़क्टराची मागणी केली मात्र त्यावरही उडवाउङवीची उत्तरे दिले. या आरोग्य केंद्रातील रिक्त पदे त्वरित न भरल्यास सोनीवासीयांनी आरोग्य केंद्रालाच कुलूप ठोकण्याचा इशारा ही दिला आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य सेविका शुभांगी भुरे यांना आरोग्य सेवा व प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसुतीचे प्रमाण वाढविण्यासाठी उपकेंद्रांंतर्गत येणाèया सोनी, दवडीपार, नोनीटोला आदी गावात प्रचार-प्रसार व जनजागृतीची जवाबदारी दिली आहे. मात्र या आरोग्य सेविका गेल्या सहा महिन्यापासून सतत भंडारा ते सोनी असा अपडाऊनचा कार्यक्रम सुरु केला आहे. सकाळी १० वाजता आरोग्य केंद्रात आल्यानंतर दुपारी १ वाजता भंडाèयाच्या परतीला कुणालाही न सांगता निघून जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. या आरोग्य सेविकेच्या दुर्लक्षतेमुळे सोनी उपकेंद्रांतर्गत प्रसुती प्राथमिक आरोग्य केंद्रात होण्याऐवजी ग्रामीण रुग्णालय गोरेगाव व गोंदियाच्या बाई गंगाबाई रुग्णालयात होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या आरोग्य सेविकेवर कारवाई करण्याची मागणी जनतेने केली आहे.