29.1 C
Gondiā
Monday, August 10, 2026
Home Top News चीनमधील अलिशान हॉटेलला आग, 10 जणांचा मृत्यू

चीनमधील अलिशान हॉटेलला आग, 10 जणांचा मृत्यू

0
20

पेइचिंग,(PTI) दि. 25 – दक्षिणपूर्व चीनमधील नानचांग शहरातील एका अलिशान हॉटेलला लागलेल्या आगीत 10 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. शनिवारी सकाळी आग लागली. या आगीत 14 जण गंभीर जखमी झाले आहेत. हॉटेलच्या नुतनीकरणाचं काम चालू असल्याने आग लागल्यानंतर काही लोकांसह कामगारही हॉटेलमध्ये अडकले होते. आग लागल्यानंतर काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, ज्यामधून आगीचं भयंकर रुप समोर येत होतं. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या होत्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं असून, आतमध्ये अजून काही लोक अडकले आहेत का याची पाहणी केली जात आहे.