25.2 C
Gondiā
Saturday, August 15, 2026
Home विदर्भ क्रीडा संकुलातील साहित्यांवर शेतकèयाचा कब्जा

क्रीडा संकुलातील साहित्यांवर शेतकèयाचा कब्जा

0
79

न्यायालयाच्या आदेशाची प्रत घेऊन पोहोचला शेतकरी : २१ खुच्र्या घेतल्या ताब्यात
berartimes.com
गोंदिया,दि.०१ मार्च :येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या उभारणीकरिता संपादीत केलेल्या शेतजमिनीचा वाढीव मोबदला देण्यात आला नाही. त्यामुळे पीडित सात शेतकèयांनी न्यायालयात धाव घेतली. यापैकी दोन शेतकèयांच्या बाजूने निकाल लागला. दरम्यान, न्यायालयाच्या आदेशाची प्रत घेऊन पीडित शेतकèयाच्या मुलाने मंगळवारी जिल्हा क्रीडा संकूल गाठत तेथील साहित्यांवर कब्जा केला. क्रीडा संकुलातील २१ खुच्र्या यावेळी शेतकèयाने ताब्यात घेतल्या.
२००९ मध्ये जिल्हा क्रीडा संकुलाच्या उभारणीकरिता नगर परिषदेने आपल्या ताब्यातील सहा एकर जागा विशेष भूअर्जन विभागाला दिली.शिवाय आठ एकर जागा ५५ शेतकèयांकडून भूअर्जन विभागाने संपादित केली होती. शेतजमिन संपादीत करण्यात आलेल्या ५५ शेतकèयांपैकी बाबूलाल नागरिकर, जितेंद्र रहांगडाले, कौशल्या गोपलानी, छोटूलाल दुबे, किसनलाल जयपुरीया, मनोहर ठाकूर व लखनलाल उपवंशी या सात शेतकèयांनी संपादीत शेतजमिनीचा मोबदला मिळाल्याचे कारण पुढे करुन २०११ मध्ये न्यायालयात धाव घेतली. या शेतकèयांपैकी बाबूलाल नागरिकर यांची २१ आर जमीन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने संपादीत केली होती. २०११ ते आतापर्यंत नागरिकर यांना ५ लाख २९ हजार ३१६ रुपये मोबदला म्हणून देण्यात आले. परंतु,न्यायालयात प्रकरण गेल्याने न्यायालयाने वाढीव मोबदला व त्यावर १५ टक्के व्याजाप्रमाणे रक्कम देण्याचे आदेश संबधित विभागाला दिले होते. या जमिनीचा मोबदला व्याजासह ३१ लाख ५८ हजार १०३ रुपये इतका होतो. ही सगळी रक्कम देण्यात यावी, अशी त्यांची मागणी आहे. तथापि बाबूलाल नागरिकर यांच्या बाजूने २२ फेबुवारी २०१६ ला न्यायालयाने निकाल दिला. तत्पूर्वी मोबदल्याच्या मागणीकरिता त्यांनी क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला. प्रत्यक्ष जाऊनही भेटले. मात्र, निराशाच पदरी पडली. अखेर न्यायालयाच्या आदेशाची प्रत घेऊन बाबूलाल नागरिकर यांचा मुलगा विष्णू नागरिकर आज,मंगळवारला जिल्हा क्रीडा संकुलात पोहोचले. त्यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचाèयांना निकालाची प्रत दाखविली.त्यावेळी प्रभारी जिल्हा क्रिडा अधिकारी सुभाष गांगरेड्डीवार हे मात्र बैठकीसाठी बाहेर गेले होते.त्यांच्याशी संपर्क साधून याप्रकरणाची माहिती दिली गेली.तेव्हा त्यांनी न्यायालयीन कामकाजात अडथळा न आणता त्यांना आपली प्रकिया करु देण्याच्या सुचना अधिनस्थ कर्मचाèयांना दिल्या. कागदोपत्री सोपस्कार पार पाडल्यानंतर विष्णू नागरिकर यांनी क्रीडा संकुलातील २१ खुच्र्या आपल्या ताब्यात घेतल्या. या कारवाईमुळे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील जमीन मोबदल्याचा प्रश्न पुन्हा एैरणीवर आला आहे.
वरिष्ठ अधिकारी कार्यालयात उपस्थित नसल्याने जप्तीची कारवाई टाळावी, आणखी दोन – तीन दिवसाचा अवधी द्यावा, अशी विनंती आम्ही शेतकरी नागरिकर यांना केली. परंतु, त्यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार साहित्य नेले. कागदोपत्री सोपस्कार पार पाडला आहे. शेतकèयांना लवकरच मोबदला मिळावा, म्हणून वरिष्ठ पातळीवर बोलणे सुरू असल्याची माहिती क्रिडा अधिकारी अनिल निमगडे यांनी दिली

..तर जिल्हा क्रीडा संकुलाची इमारतही ताब्यात घेऊ
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने शेतजमिनीचा पूर्ण मोबदला दिला नाही तर, जिल्हा क्रीडा संकुलाची इमारतही ताब्यात घेऊ असा इशारा विष्णू नागरिकर यांनी दिला.