27 C
Gondiā
Saturday, August 15, 2026
Home विदर्भ पवार समाज कृती समितीचे रविवारी निदर्शने

पवार समाज कृती समितीचे रविवारी निदर्शने

0
29

नागपूर,दि.4 –समाजातील ज्येष्ठ समाजसेवक घनश्याम चौधरी यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा निषेध म्हणून संविधान चौक येथे रविवार, ५ मार्च रोजी सकाळी ११ वाजता निदर्शने करण्यात येणार आहेत, अशी माहिती पवार समाज कृती समितीचे अध्यक्ष किसना देवासे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
पांढराबोडी नागपूर येथील रहिवासी असलेल्या चौधरी यांच्यावर २१ फेब्रुवारी रोजी प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. यामध्ये चौधरी यांच्यासह त्यांचे सहकारीही जबर जखमी झाले होते. त्यांना पोलिसांच्या मदतीने रविनगर येथील दंदे हॉस्पीटलमध्ये भरती करण्यात आले होते. अपंग असलेले चौधरी हे सामाजिक कार्यकर्ता असून राजकारणात देखील ते सक्रिय होते.
राजकीय वैमनस्यातूनच आमदार परिणय फु के आणि त्यांच्या अनेक सहकार्‍यांनी पूर्वनियोजित कट रचून प्राणघातक हल्ला केला होता. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली असून, अद्यापही त्या संदर्भात काही कारवाई करण्यात आली नसल्याने या घटनेचा निषेध म्हणून पवार समाज कृती समितीच्यावतीने निदर्शने करण्यात येणार आहेत, असे देवासे यांनी सांगितले. समाजातील व्यक्तीवर अशाप्रकारचा हल्ला होण्याची ही पाचवी घटना असून न्याय न मिळाल्यास समाज रस्त्यावर येऊन आंदोलन उभारणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी रमेश टेंभरे, एस.एम. पारधी, गजेंद्रसिंह ठाकूर, पृथ्वीराज रहांगडाले आदींची उपस्थिती होती.