26.3 C
Gondiā
Saturday, August 15, 2026
Home विदर्भ आमदार आदर्श ग्राम कनेरीत विकासकामांचे पालकमंत्र्यानी केले भूमिपूजन

आमदार आदर्श ग्राम कनेरीत विकासकामांचे पालकमंत्र्यानी केले भूमिपूजन

0
25

सडक अर्जुनी,दि.४-अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील सड़क अर्जुनी तालुक्यातील आमदार आदर्श ग्राम कनेरी/राम येथे आज ४ मार्च ला जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बड़ोले यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यात २५१५ लेखाशीर्ष अंतर्गत ३५ लक्ष निधितून ९ सीमेंट रस्ते व जन सुविधेच्या कामात १२ लक्ष निधितून बोरवेल, चावड़ी, स्मशानभूमि रस्ता कामाचे समावेश आहे. या वेळी प्रामुख्याने प स सभापती कविताताई रंगारी, जि प सदस्य माधुरीताई पाथोड़े, सरपंच इंदुताई मेंढे, गटविकास अधिकारी अरुण लोकरे, प स सदस्य गिरधारी हत्तिमारे, प स सदस्य राजेश कठाने, भाजपा तालुकाध्यक्ष विजय बिसेन, आदिवासी सेवा सहकारी सोसायटी अध्यक्ष लक्ष्मीकान्त धानगाये, कृषि उत्पन्न बाजार समिति संचालक वसंता गहाने, अर्जुन घरोटे, परमानन्द बड़ोले, उपसरपंच प्रेमलाल मेंढे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, उपविभागीय अभियंता दिलीप देशमुख, नायब तहसीलदार अखिल मेश्राम, शाखा अभियंता अगड़े, सचिव चित्रा बागड़े, चेतन वडगाये सर्व ग्राम पंचायत सदस्य व मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.