भारतीय संघाच्या निराशाजनक खेळानंतर कांगारूंची दमदार सुरूवात

0
15

वृत्तसंस्था बंगळुरू दि. 4 -भारताविरूद्ध दूसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने आपल्या पहिल्या इनिंगमध्ये दमदार सुरूवात केली आहे. एकही विकेट न गमवता ऑस्ट्रेलियाने 40 रन बनवले आहेत. डेविड वॉर्नर (23) आणि मेट रेनशॉ (15) क्रीज वर खेळत आहेत. पहिल्याच इंनिंगमध्ये भारतीय संघाची कामगिरी अतिशय निराशाजनक राहिली. लोकेश राहूल व्यतिरिक्त कोणताही फलंदाज इंग्लडच्या गोलंदाजीचा सामना करू शकला नाही. ऑस्ट्रेलियाकडून एकट्या नथान लियोनने 8 विकेट पटकवले.पहिलाच अंतराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी आलेला अभिनव मुकुंद आणि चेतेश्वर पुजारा दोघेही लंच आधीच बाद झाले आहेत.
भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या समान्यात विराट आणि टीमला 333 धावांनी मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. भारतीय संघ या मालिकेत पुनरगामन करेलच, तसेच मालिकाही जिंकेल असा विश्वास सामन्याआधी संघाचे प्रशिक्षक अनिल कुंबळेंनी व्यक्त केला आहे. चार कसोटी सामन्याच्या मालिकेत ऑस्ट्रेलिया 1-0 ने आघाडीवर आहे.

टीम इंडियामध्ये बदल…
– दुसऱ्या सामन्यासाठी टीम इंडियात दोन बदल करण्यात आले आहेत.
– मुरली विजयच्या जागेवर अभिनव मुकुंदला स्थान देण्यात आले आ
– तसेच जयंत यादवऐवजी करुण नायरला संघात स्थान देण्यात आले आहे.
– ऑस्ट्रेलियाने मात्र संघात कोणताही बदल केला नाही,

बंगळुरूत असे आहे भारताचे रेकॉर्ड…
– बंगळुरुच्या एम.चिन्नास्वामी स्टेडियमवर टीम इंडियाचे फिफ्टी-फिफ्टीचे रेकॉर्ड आहे.
– भारताने या मैदानावर 21 कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी 6 सामने जिकले, तर 6 मध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. 9 सामने ड्रॉ राहिले आहेत.
– ऑस्ट्रेलियाने या मैदानावर 5 कसोटी सामने खेळले आहे, त्यातील 2 सामण्यात ऑस्ट्रेलिया संघ विजयी राहिला आहे.
– ऑस्ट्रेलियाने ऑक्टोबर 2004 मध्ये भारताला याच मैदानावर 217 रनने हरवले होते.
– भारताने 6 वर्षानंतर ऑक्टोबर 2010 मध्ये याच मैदानावर ऑस्ट्रेलियाला 7 विकेटने हरवून पराभवाचा बदला घेतला होता.
दोन्ही संघ:
भारत-लोकेश राहुल, अभिनव मुकुंद, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, करुण नायर, आर. अश्विन, रिद्धिमान साहा, रवींद्र जडेजा, उमेश यादव आणि इशांत शर्मा.

ऑस्ट्रेलिया- डेविड वॉर्नर, मेच रॅनशॉ, स्टीव स्मिथ, शॉन मार्श, पीटर हँड्सकॉम्ब, मिशेल मार्श, मॅथ्यू वेड, मिशेल स्टार्क, स्टीव ओकीफे, नाथन लियोन आणि जोश हेजलवुड.