30.2 C
Gondiā
Monday, June 22, 2026
Home Top News महाराष्ट्रातील जवानाचा बर्फात गुदमरुन मृत्यू

महाराष्ट्रातील जवानाचा बर्फात गुदमरुन मृत्यू

0
20

वृत्तसंस्था श्रीनगर, दि. 10 – लेह-श्रीनगर मार्गावरील दराज येथे महाराष्ट्रातील जवानाचा बर्फात गुदमरुन मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. जवान महादेव तुपारे असं या जवानाचं नाव असून चंदगड तालुक्यातील महिपाळगडचे ते रहिवासी आहेत. त्यांच्या निधनाची बातमी कळतात संपुर्ण चंदगड तालुक्यावर शोककळा पसरली आहे. 8 मार्च रोजी ही घटना घडली. सैन्यात क्लार्क पदावर कार्यरत असणारे महादेव तुपारे 16 कुमाँऊ रेजिमेंटमध्ये उत्तराखंड येथे सैन्यात 2005 साली भरती झाले होते. महादेव तुपारे यांच्या निधनाती बातमी सैन्यातील अधिका-यांनीच त्यांच्या कुटुंबियांना कळवली. ही बातमी कळताच कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. लेह-श्रीनगर भागात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत आहे. यामुळे अनेक ठिकाणी रस्ते बंद झाले असून महादेव यांचं पार्थिव पोहचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.