25.8 C
Gondiā
Friday, August 14, 2026
Home Featured News आत्महत्या करुन काहीच साध्य होणार नाही : भारत गणेशपुरे

आत्महत्या करुन काहीच साध्य होणार नाही : भारत गणेशपुरे

0
27

वर्धा,दि.17 : “सध्या शेतकरी भयान परिस्थितीला समोरं जात आहे. ज्यांच्या घरी आत्महत्या झाल्या आहेत त्यांच्याकडे पाहून परिस्थिती पाहा, समजा आणि मग निर्णय घ्या. आत्महत्या करुन काहीच साध्य झालं नाही, इतिहासात डोकावून पाहा,” असे आवाहन प्रसिद्ध विनोदी अभिनेते भारत गणेशपुरे यांनी केले आहे. वर्ध्याच्या आर्वी तालुक्यातील रोहणा येथे पानी फाऊंडेशनने आयोजित कार्यक्रमात भारत गणेशपुरे बोलत होते.‘सत्यमेव जयते’ पानी फाऊंडेशनच्या वॉटर कपच्या दुसऱ्या सीझनमध्ये, वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्याची निवड करण्यात आली आहे. गावोगावी मोठ्या हिरीरीने जलसंधारणाच्या कामात लोक सहभागी होत आहेत. याच कौतुक करत भारत गणेशपुरे यांनी पाण्याची येत्या काळातील गरज खास वैदर्भीय भाषेत सांगितली.यावेळी मंचावर खासदार रामदास तडसही उपस्थित होते. त्यांनी आमीर खान यांच्या पानी फाऊंडेशनकडून सुरु असलेल्या कामाचं कौतुक केले. शिवाय लोकांनी हे काम स्वत:साठी करत आहात ही भावना मनात ठेऊन एकजुटीने दुष्काळाशी दोन हात करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. यावेळी आळंदीचे कीर्तनकार रामराम ढोक महाराज यांनीही लोकांचं प्रबोधन केले आहे.