महाराष्ट्र राज्याचे माहिती आयुक्त गायकवाडांना मारहाण April 17, 2017 020 FacebookXPinterestWhatsAppTelegram औरंगाबाद,दि.17- राज्याचे माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांना आणि त्यांच्या पत्नीला भारिप पदाधिका-यांनी औरगांबादेतील सुभेदारीत बेदम मारहाण केल्याची घटना घडली.या मारहाणीत गायकवाड यांच्या छातीला मार लागला आहे.याप्रकरणी बेगमपुरा पोलिसांनी भारिपचे अमित भुईगळ व कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात आहे.गायकवाड यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. मुंबईतील आंबेडकर भवन पाडकामाच्या रागातून रत्नाकर गायकवाड यांना मारहाण केली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे. गायकवाड यांना मारहाण करीत असताना पत्नी सोडवण्यासाठी मध्ये गेली असता त्यांनाही मारहाण झाली आहे. याप्रकरणी बेगमपुरा पोलिसांनी दोन महिला आणि चार पुरुष कार्यकर्त्यांना अटक केली आहे.