26.6 C
Gondiā
Wednesday, August 12, 2026
Home Top News हिमालच प्रदेशात बस नदीत कोसळून 44 प्रवाशांचा मृत्यू

हिमालच प्रदेशात बस नदीत कोसळून 44 प्रवाशांचा मृत्यू

0
30
शिमला, दि. 19(वृत्तसंस्था0- हिमाचल प्रदेशात बस नदीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 44 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. अपघातग्रस्त खासगी बस टोन्स नदीत कोसळून हा अपघात झाला आहे. नेरिया भागातील गुम्मा येथे ही दुर्घटना घडली आहे. पोलिसांनी मृतांचा आकडा वाढवण्याची भीती व्यक्त केली असून आकडा 56 पर्यत पोहोचण्याची शक्यता आहे. बचावपथक घटनास्थळी दाखल झाले आहे.सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त खासगी बस उत्तराखंडमधील तियुनी येथून सकाळी निघाली होती. बसच्या अपघाताची माहिती मिळताच सिरमोर पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्याला सुरुवात केली आहे