31.3 C
Gondiā
Friday, June 19, 2026
Home राष्ट्रीय देश ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचं निधन

ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचं निधन

0
22

मुंबई,दि.27: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचे निधन झाले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे विनोद खन्ना यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु होते. नुकतंच त्यांना कॅन्सर असल्याचे निदान झाले होते. अखेर आज 70 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. मुंबईतील हरकिशन दास रुग्णालायत त्यांनी 11 वा. 20 मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला.विनोद खन्ना शेवटचे ‘एक थी राणी’ या सिनेमात दिसले होते. यापूर्वी 2015 मध्ये शाहरुख खानच्या ‘दिलवाले’ या सिनेमातही विनोद खन्ना पाहायला मिळाले होते.