24.2 C
Gondiā
Friday, August 21, 2026
Home महाराष्ट्र वाहनांवरील लाल व अंबर दिवे तात्काळ काढून टाका – आरटीओ

वाहनांवरील लाल व अंबर दिवे तात्काळ काढून टाका – आरटीओ

0
48

उच्च पदस्थांच्या एस्कॉर्टींग करणाऱ्या वाहनांवर दिवे लावता येणार नाहीत

नरेश तुप्तेवार, नोंदेड दि. 07 :- जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुखांनी केंद्र शासनाच्या सुधारणेनुसार ज्या वाहनांवर दिवा लावण्यास अनुज्ञेय नाही त्या वाहनांवरील लाल, अंबर दिवे व ॲम्ब्युलन्सवरील दिवे काढून टाकावेत, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

केंद्र सरकारने १ मे २०१७ रोजी केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम १०८ मध्ये सुधारणा केली आहे. या तरतुदीनुसार वाहनांवरील लाल , अंबर दिवा तसेच ॲम्ब्युलन्सवरील दिवा अनुज्ञेय नाही. त्याच बरोबर उच्च पदस्थांच्या एस्कॉर्टींग करणाऱ्या वाहनांवर दिवे लावता येणार नाहीत. आपत्कालीन किंवा आणिबाणी व्यवस्थापनासाठी विशिष्ट प्रकारची रचना केलेल्या वाहनांवर केंद्र शासन विनिर्दिष्ट करेल त्यानुसार बहुरंगी लाल, निळा आणि पांढरा रंगाचा दिवा लावण्यास परवानगी आहे. त्याशिवाय एअरपोर्ट, बंदरक्षेत्र, खनिक्षेत्र आणि प्रकल्पांच्या क्षेत्रात चालणाऱ्या वाहनांवर त्यांच्या कार्यक्षेत्रात अंबर दिवा लावता येईल.तरी ही दिवे अशा वाहनधारकांनी तात्काळ काढून घ्यावेत अन्यथा मोटार वाहन नूतन कायद्यानुसार कार्यवाही करण्यात येईल.असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नांदेड यांनी केले आहे.