आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत खेळणार

0
11

नवी दिल्ली, दि. 7 – आयसीसी चॅम्पियन्स स्पर्धेत खेळण्याचा भारतीय संघाचा मार्ग मोकळा झाला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळण्यासाठी भारतीय संघाला हिरवा कंदील दिला आहे.  आज रविवारी आयोजित विशेष आमसभेमध्ये हा निर्णय घेण्यात आला. येत्या दोन दिवसात संघ जाहीर करू, संघनिवडीसाठी निवड समितीची बैठक 8 मे रोजी होईल असं बीसीसीआयने स्पष्ट केलं.

आयसीसीच्या नव्या आर्थिक मॉडेलमध्ये महसुलीत मोठा वाटा मिळावा यासाठी दबावतंत्राचा वापर म्हणून जगातील सर्वांत श्रीमंत मानल्या जणाऱ्या बीसीसीआयने संघ पाठविण्याची २५ एप्रिलची ‘डेडलाइन’देखील पाळली नव्हती. आयसीसीने बीसीसीआयचा वाटा ५७ लाख डॉलरवरून कमी करून २९.३ लाख डॉलरवर आणला आहे.आमसभेपूर्वी शनिवारी सीओएने राज्य संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली होती. भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीतून माघार घेतल्यास संभाव्य गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा प्रशासकांच्या (सीओए) समितीने बीसीसीआयला दिला होता.