31.4 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ मलकापूरात काॅग्रेस आक्रमक दानवेंचा पुतळा चपलाजोड्यांनी बदडून जाळला

मलकापूरात काॅग्रेस आक्रमक दानवेंचा पुतळा चपलाजोड्यांनी बदडून जाळला

0
37

मलकापूर,दि.11: – शेतकर्यांच्या तुर खरेदी प्रकरणावरुन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी बेताल वक्तव्य करून शेतकर्यांना अर्वाच्य भाषेत शिविगाळ केल्याचा निषेध तालुका व शहर काॅग्रेसकमेटीने केला असुन स्थानिक चारखांबा चौकात डफडे वाजवुन दानवेच्या पुतळ्यास भर चौकात चपलाजोड्यानी बदडुन पुतळा जाळला.या आंदोलनात नगराध्यक्ष तथा तालुकाध्यक्ष अॅड हरीश रावळ,शहराध्यक्ष राजु पाटील,नगरसेवक अनिल गांधी,अॅड जावेद कुरेशी,गजानन ठोसर,सुरेश भोजने,प्रा.अनिल खर्चे, बंडू चौधरी,रईस जमादार, जाकीर मेमन,डाॅ.सलीम कुरेशी,विनय काळे,फिरोजखान,अरूण गवात्रे,सुनिल बगाडे,राजु उखर्डे,शाकीरखान सह काॅग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.