गोंदिया, दि.29 : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश, गोंदिया यांच्या आदेशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा न्यायालय गोदिया मार्फत ग्रामपंचायत कवलेवाडा ता.गोरेगाव येथे 21 ऑगस्ट 2026 रोजी ‘राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिवस’ निमित्ताने कायदेविषयक जनजागृती कार्यकम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव एन.के. वाळके, सहाय्यक लोकअभिरक्षक अॅड. अतुल येडे, रिटेनर/पॅनल लॉयर अॅड. रोशनी पटले, पोलिस पाटील डोंगरुटोला किशोरकुमार भगत, पोलिस पाटील कवलेवाडा राहुल बोरकर, ग्रामपंचायत कवलेवाडा सरपंच सकुंतला कटरे, उपसरपंच टोमेंद्र तांडेकर, ग्रामविकास अधिकारी एस.एस. पाझारे, पी.एल.व्ही. आनंदकुमार पटले, माजी पं.स. सदस्य कुतनबाई पारधी व कवलेवाडा गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी अॅड. अतुल येडे यांनी 21 ऑगस्ट राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन, NALSAची राष्ट्रीय विधी सेवा हेल्पलाइन आणि नालसा पोर्टल, नालसा जागृती योजना 2025, नालसा योजना 2025 अंतर्गत शिक्षण, प्रतिबंध आणि पुनर्वसन उपाययोजना, समाजात महिलांची सुरक्षा आणि गोपनीयता या विषयावर माहिती दिली.
अॅड. रोशनी पटले यांनी पर्यायी विवाद निवारण (ADR) आणि त्यांचे फायदे, नागरिकांची मुलभूत कर्तव्ये, पीडीत व्यक्तींसाठी नुकसानभरपाई योजना, वन्यजीव-मानव संघर्ष प्रकरणांमधील पीडीतांना न्याय मिळवून देण्याबाबतची NALSA योजना 2025 या विषयावर मार्गदर्शन केले.ॲड. एन.के. वाळके यांनी अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठ नागरिकांचे कर्तव्य व हक्क या विषयी माहिती दिली. तसेच जेष्ठ नागरिकांच्या ‘समस्या, त्यांचे अधिकार, कायदेशीर सरंक्षण, मोफत कायदेविषयक सेवा तसेच शासनाच्या विविध योजनांबाबत सांगितले.
यावेळी ज्येष्ठ नागरिक हे समाजाचे मार्गदर्शक असून त्यांच्या अनुभवाचा व ज्ञानाचा आदर करणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे असे सांगण्यात आले. सदर कार्यकमाच्या माध्यमातुन जेष्ठ नागरिकांना कायदेशीर मदत व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली.सुत्रसंचालन किशोरकुमार भगत यांनी केले, तर उपस्थितांचे आभार राहुल बोरकर यांनी मानले. कार्यक्रमास कवलेवाडा गावातील रहिवासी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गोंदिया कर्मचारी व पी.एल व्ही असे जवळपास 100 नागरिक उपस्थित होते.





