
नांदेड, दि.16 मे-महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सण २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या विभागीय पोलीस उपनिरिक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत पो.कॉ.मुरारी किशनराव कोकलेगावकर यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
नायगाव (खु.) तालुक्याचे भूमिपूत्र असलेले मुरारी किशनराव कोकलेगावकर हे २६ सप्टेंबर २००७ साली नांदेड पोलीस दलात सामील झाले. आपले कर्तव्य बजावत असतांनाच कठोर मेहनत व सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर २०१६ च्या विभागीय पोलीस उपनिरिक्षक पदाच्या परीक्षेत त्यांनी यशाला गवसणी घातली. सदरील परीक्षेव्दारे ८२८ जणांची पोलीस उपनिरिक्षक पदासाठी निवड करण्यात आली. त्यातील ११८ जण हे आरक्षीत संवर्गातून निवडण्यात आले. आपल्या यशाचे श्रेय त्यांनी आई – वडिल, पत्नी व बहिण यांना दिले आहे. मुरारी किशनराव कोकलेगावकर हे पोलीस अधिकारी बनले असून त्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल बळी शिंदे, विनोद राणे, गणेश वाघमारे, ज्ञानेश्वर तोषटवाड, नंदकुमार बेळके, प्रोफ. गोविंद बेळके, प्रोफ. बाळू डुगडुमवार, शरद भालेराव आदींसह नातेवाईक, मित्र मंडळी व आप्तस्वकीयांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.




