वणव्यामुळे काळ्या हरणांच्या जीवाला धोका

0
9

गोंदिया,दि.16 -गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया -आमगाव राज्यमार्गाला लागून असलेल्या दहेगाव-मानेगावच्या जंगलात सोमवारच्या सायकांळी लागलेल्या आगीमूळे वन्यजीव विभागासह वनविभागात एकच खळबळ माजली आहे.या जंगलात काळ्या हरणाचा (ब्लग बक)सहवास मोठ्या प्रमाणात असून विदर्भातील सर्वाधिक संख्या याच जंगलात आहे.हे जंगल काळ्या हरणासांठीच ओळखले जात असून पर्यटकही येथे येऊ लागले असतानाच या आगीमूळे त्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.जंगलात अचानक आग लागल्याने व सायकांळची वेळ झाल्याने ती आग आटोक्यात आणायला वनविभागाला त्रास झाला आज मंगळवारला सकाळी त्या आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.तोपर्यंत बहुतांश जंगलातील भाग आगीने भस्म झालेला आहे.