31.4 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home महाराष्ट्र कापीस राशी ६५९ बियाणेवर बंदी

कापीस राशी ६५९ बियाणेवर बंदी

0
46

@ कापूस राशी 659 बियाणेवर बंदी @
८ कोटी १० लाख रुपये किमतीचे १ लाख १ हजार २८० पाॅकिटे विक्रीसाठी जिल्हियात.

  • शेतक-यांनी हे बियाणे खरेदी करु नयेत व खरेदी करतांना काळजी घ्यावी.

नांदेड,दि.१८ :-नांदेड जिल्ह्यात खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात कापूस पिकाची लागवड केली जाते ही बाब हेरुन खरीप असंख्य बियाणे कंपण्यांनी कृषि केंद्रावर मोठा बाजार मांडला असून यात काही बियाणांत दोष असलेले बियाणेही विक्री होण्याची शक्यता आहे.अशाचपैकी सेंदरी बोंडाळीचा प्रादुर्भाव असलेल्या राशी ६५९ वाणाच्या कापूस बियाणाच्या पिशव्या जिल्ह्यात विक्रीसाठी आलेल्या आहेत.या वाणाचे बियाणे शेतक-यांनी खरेदी करु नये व केले असेल तर ते विक्रेत्यास परत करावे.असे न केल्यास होणा-या परिणामास शेतकरी हे स्वत: जबाबदार असतील व बियाणे, रासायनिक खते, किटकनाशक औषधी खरेदी करताना शेगतकऱ्यांनी गुणवत्ता व दर्जाविषयी काळजी घ्यावी, असे आवाहन नांदेड जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी पंडीत मोरे यांनी केले आहे. किनवट, माहूर, हिमायतनगर, भोकर, हदगाव, बिलोली व धर्माबाद यासह अन्य खरीप क्षेत्रात कापसाचे पिक मोठया प्रमाणावर घेतले जाते. नगदी पीक म्हणून कापूस उत्पादक शेतकरी कापूस लागवडीला प्राधान्य देतात.कापूस बियाणात राशी ६५९ या वाणाला पसंती देतात. मात्र हे वाणच (बोंडअळी) अळीला बळी पडत असल्याने कृषि आयुक्तालयाने राज्यात या वाणावरच बंदी घातली आहे. विभागीय,जिल्हास्तरीय तसेच तालुकास्तरीय भरारी पथकाने ही विक्री बंद केली आहे.
जिल्ह्यात कपाशीची राशी ६५९ या बियाण्याला उपरोक्त तालुक्यातून मोठी मागणी आहे. मात्र हेच वाण गुलाबी (बोंडअळी) अळीला बळी पडत असल्याने कृषि आयुक्तालयाने बंदी घातली आहे.जिल्हयात राशी ६५९ या वाणाच्या बियाणाची १ लाख १ हजार २८ पॉकिटे विक्रीसाठी आली आहेत. त्याची किंमत ८ कोटी १० लाख रुपये आहे. यावर विक्री बंदीचे आदेश देण्यात आले असून जिल्हा व तालुकास्तरीय भरारी पथके ही विक्री रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्याकडूनच खरेदीस प्राधान्य दयावे. बनावट व भेसळयुक्त बियाणे, खते, किटकनाशके खरेदी टाळण्यासाठी अधिकृत विक्रेत्यांकडून पक्या पावतीसह ती खरेदी करावी. पावतीवर शेतकऱ्याची व विक्रेत्याची स्वाक्षरी व मोबाईल नंबरची नोंद करुन पिक निघेपर्यंत पावती संभाळून ठेवावी. खरेदी केलेल्या बियाणेचे वेष्टन / पिशवी, टॅग, खरेदीची पावती व त्यातील थोडे बियाणे पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावे. भेसळीची शंका दूर करण्यासाठी बियाणेची पाकिटे सिलबंद, मोहोर बंद असल्याची खात्री करावी. बियाणे उगवणीच्या खात्रीसाठी पाकिटावरची अंतीम मुदत पाहून घ्यावी. कमी वजनाच्या निविष्ठा तसेच छापील किंमतीपेक्षा जास्त किंमतीने विक्री अथवा इतर तक्रारीसाठी जवळच्या कृषि विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधा. किटकनाशके अंतीम मुदतीचे आतील असल्याची खात्री करावी. आपल्या तक्रारी विषयी माहिती प्रत्यक्ष, दुरध्वनी, ई-मेल, एस.एम.एस. इत्यादीद्वारे देवून शासनाच्या गतीमान गुणनियंत्रण अभियानात सहभागी व्हावे. कृषि निविष्ठांविषयी असलेल्या अडचणी, तक्रारी सोडविण्यासाठी, मार्गदर्शनाकरीता कृषि विभागाच्या टोल फ्री क्र.१८०० २३३ ४००० वर संपर्क साधावा. विक्री केंद्रावर भरारी पथकाचे फोन नंबर दिले आहेत. अडचणी सोडविण्यासाठी फोनवर संपर्क साधावा. गुरुवार १ जून २०१७ पासून डीबीटीद्वारे रासायनिक खताची विक्री करण्यात येणार आहे. खत खरेदी करताना आधारकार्ड आवश्यक आहे. आधारकार्ड नंबर देऊनच खताची खरेदी करावी, असेही आवाहन कृषि विकास अधिकारी यांनी केले आहे.