नामांकित स्विडीश कंपनीच्या आयकीया स्टोअरचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

0
19

 

नामांकित स्वीडिश फर्निचर कंपनी आयकियाच्या स्टोअरचे भूमिपूजन

पोषक वातावरणामुळे अनेक स्वीडिश कंपन्या महाराष्ट्रात येण्यास उत्सुक

–मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


ठाणे दि १८: आयकिया ( IKEA) सारखी स्वीडनमधली जगविख्यात फर्निचर कंपनीने आपले  भव्य स्टोअर्स उभारण्यासाठी मुंबईची निवड केली याचा आम्हला आनंद होत असून अनेक स्वीडिश कंपन्या देखील महाराष्ट्रात येण्यास उत्सुक आहेत  असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. आयकिया कंपनीतर्फे उभारण्यात येणाऱ्या भव्य फर्निचर स्टोअरचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.  तुर्भे औद्योगिक परिसरात ठाणे –बेलापूर मार्गावर २६ एकर जागेत या कंपनीचे हे स्टोअर २०१९ पर्यंत पूर्ण होणार असून १ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक यात करण्यात येणार आहे. या स्टोअरमुळे सुमारे २५०० लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

 

गेल्या वर्षी करण्यात आलेल्या आपल्या जर्मन दौऱ्याचा संदर्भ देऊन मुख्यमंत्री म्हणाले की, थोड्याच कालावधीसाठी मला स्वीडन दौऱ्यावर स्टॉकहोम येथे आयकिया कंपनीच्या अद्ययावत अशा स्टोअरला भेट देण्याची संधी मिळाली, मी तिथे १-२ तास होतो पण हे स्टोअर पाहून भारावून गेलो होतो. नंतर कंपनीसमवेत आमच्या शिष्टमंडळाशी चर्चाही झाली आणि सामंजस्य करार झाला. केवळ एका दिवसात या कंपनीला आवश्यक असणारी पर्यावरण मंजुरी मिळवून देऊन आम्ही येथील प्रकल्पाचा मार्ग मोकळा केला. राज्यातील औद्योगिक परिस्थिती आता बदलली असून अनेक क्लिष्ट नियम आणि अटींच्या ऐवजी गुंतवणूकदारांना अपेक्षित असणारी वेगवान प्रक्रिया आम्ही अंमलात आणली आहे. त्यामुळेच अनेक स्वीडिश कंपन्या देखील महाराष्ट्रात येण्यास उत्सुक असून आम्ही त्यांचे सहर्ष स्वगतच करतो.

स्थानिक कारागिरांना रोजगार

आयकियाच्या राज्यातील या गुंतवणुकीमुळे स्थानिक उद्योगांना, कारागिरांना  मोठय़ा प्रमाणावर काम मिळणार आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, स्थानिक फर्निचर व्यवसायाला देखील चालना मिळेल. राज्यात मोठ्या प्रमाणावर परवडणाऱ्या घरांची आम्ही निर्मिती करीत असून २ दशलक्ष घरे बांधण्याचे आमचे नियोजन आहे. अशा घरांना आयकिया सारख्या कंपनीतून उत्पादित चांगल्या दर्जाचे, स्मार्ट आणि परवडणारे फर्निचर उपयुक्त ठरू शकेल.

महिलांना रात्री कामासाठी मुभा

आयकिया नेहमीच आपल्या प्रकल्पांतून ५० टक्के महिला कर्मचारी नियुक्त करते याचा संदर्भ देऊन मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात देखील आम्ही महिलांना रात्रपाळी किंवा रात्री उशिरापर्यंत काम करण्याबाबत कायद्यात सुधारणा केली असून कंपनीने केवळ महिलांच्या सुरक्षेची काळजी घ्यावयाची अट आहे. आयकियाच्या सामाजिक कामाचे देखील मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.

प्रारंभी स्वीडनच्या व्यापार विभागाच्या महासंचालक करीन ओलोप्सडॉटर यांनी आपल्या भाषणात विशेषत: मुख्यमंत्र्यांनी हे स्टोअर याठिकाणी यावे यासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. पर्यावारा, लोकशाही , स्मार्ट तंत्रज्ञान , संस्कृती यासारख्या तत्वांचा आम्ही नेहमीच आदर करतो आणि ही तत्वे अंगीकारतो असे त्या म्हणाल्या. २५ पेक्षाही जास्त अशी स्टोर्स भारतात उभारावी कारण येथे मोठी बाजारपेठ आहे असे त्या म्हणल्या. आयकिया इंडियाचे सीईओ जुवेन्शियो मेटझू यांनी देखील आपल्या भाषणात मुख्यमंत्री तसेच एमआयडीसी, व इतर सानाब्न्धीत विभागणी केलेल्या सहकार्याचे कौतुक केले. मी भारतात ५ वर्षांपूर्वी आलो होतो. मुंबईची संस्कृती, येथील जीवनमान, उद्योग व्यवसायाभिमुखता, आर्थिक चित्र मला कंपनीसाठी सकारात्मक वाटले आणि म्हणून आम्ही येथे येण्याचा निर्णय घेतला असे ते म्हणाले. विशेषत: दुर्बल गटातील लोकांना, महिला तसेच कारागिरांना रोजगार मिळावा असे कंपनीचे धोरण असून ते आम्ही येथे राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यानंतर मान्यवरांनी प्रतिकात्मकरित्या कुदळ, फावडी घेऊन परिसरात भूमिपूजनाच्या कामाचा शुभारंभ केला.  याप्रसंगी आमदार संदीप नाईक,मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर तसेच इतर मान्यवर उपस्थित