37.3 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ मासुलकसाजवळ टक्करमध्ये दोन ट्रकला आग

मासुलकसाजवळ टक्करमध्ये दोन ट्रकला आग

0
12

सडक अर्जुनी,दि.19- गोंदिया जिल्ह्यातून जाणार्या मुंबई-कलकत्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर डुग्गीपार पोलीस ठाणेअंतर्गंत  मासूलकसा घाटावर आज सकाळच्या सुमारास दोन ट्रकच्या अमोरासमोर झालेल्या धडकेत दोन्ही ट्रकनी आग घेतल्याची घटना घडली. टक्कर इतकी जोरात होती कि ट्रकला लगेच आग लागली. या आगीत एका ट्रक चालकाचा मृत्यू झाला तर यात इतर चार लोक जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.अग्निशमनदलाला त्वरीत सुचना देण्यात आली,तोपर्यंत नागरिकांनी आग आटोक्यात आण्यासाठी प्रयत्न केले.

blank