सिरोच्यांतील वडदम येथे चार घरांना आग

0
9

गडचिरोली,दि.19- जिल्ह्यातील  सिरोंचा तालुक्यातील वडदम येथे आज दि. 19 मे  रोजी पहाटे अंदाजे ४ वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याने  ४ घरे संपूर्णपणे खाक झाल्याची घटना घडली.यामुळे  ४ कुटुंबातील १५ सदस्य आपदग्रस्त झाले असून जिवितहानी झालेली नाही.यात 1० ते १५ लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज असून घटनास्थळावर सिरोंचाचे नायब तहसिलदार सत्यनारायण कडार्ला व मंडळ अधिकारी गोवर्धन गागापुरपु यांनी पाचून पंचनामा केला आहे.