41.3 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home राजकीय खा.पटेलांसह राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांना अटक व सुटका

खा.पटेलांसह राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांना अटक व सुटका

0
20

blank

भंडारा,दि.22 – शेतक-यांना कर्जमुक्ती मिळालीच पाहिजे, शेतकºयांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे, या मागणीसाठी भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आज राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.खा.पटेल यांनी गेल्या दीड दोन वर्षानंतर पहिल्यांदाच विरोधी पक्षाच्या नेत्यासारखी भूमिका या आंदोलनातून घेतली.आपल्या आंदोलनाचे निवेदन स्वीकारण्यासाठी आंदोलनस्थळी जिल्हाधिकारी आले पाहिजे, ही मागणी रेटून धरली.मात्र जिल्हाधिका-यांनी येण्यासाठी स्पष्ट नकार दिला. त्यानंतर खासदार प्रफुल्ल पटेलांसह शेतकरी व राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्गावर रणरणत्या उन्हात ठिय्या मांडला. त्यानंतर पोलिसांनी पटेलांसह शेकडो कार्यकर्त्यांना पोलीस वाहनात कोंबून अटक केली.

जिल्हाधिका-यांनी आंदोलनस्थळी येऊन शेतक-यांचे निवेदन स्वीकारावे, अशी भूमिका खा.प्रफुल पटेल यांनी घेतली. मात्र जिल्हाधिकारी आंदोलनस्थळी येणार नाहीत याची माहिती तहसिलदार संजय पवार तथा उपविभागीय पोलीस अधिकारी संजय जोगदंड यांनी आंदोलनकर्त्यांना दिली. त्यामुळे खा. पटेल मंडपातून उठून महामार्गावर आले आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा रोखून धरला.जोपर्यंत जिल्हाधिकारी निवेदन स्वीकारत नाही तोपर्यंत येथून उठणार नाही, अशी रोखठोक भूमिका त्यांनी घेतली होती. जिल्हाधिकारी आंदोलनस्थळी येणार नाहीत, हे स्पष्ट झाल्यानंतर पोलीस प्रशासनाच्यावतीने उपविभागीय पोलीस अधिकारी संजय जोगदंड यांनी दोनवेळा  इशारा देत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कायदेशीर कारवाई करण्याची सुचना केली. त्यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना रस्त्यावरून उठवून पोलीस वाहनात कोंबण्यास सुरूवात केली. सर्वात शेवटी वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी प्रफुल पटेलांना पोलीस वाहनात बसविले. खा. पटेलांसह आंदोलनकर्त्यांना घेतलेल्या कार्यकर्त्यांना पोलीस मुख्यालय परिसरातील सभागृहात नेण्यात आले. तिथे सर्वांवर गुन्हे दाखल करून नंतर सुटका करण्यात आली.

 

blank