31.4 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ पिपरी व श्रीरामनगरात पोलिसांची जनजागरण सभा

पिपरी व श्रीरामनगरात पोलिसांची जनजागरण सभा

0
24

सडक अर्जुनी,दि.25- सडक अर्जुनी,साकोली,अर्जुनी मोरगाव तालुक्यातंर्गत गावामध्ये सध्या चोरीच्या घटनामंध्ये सातत्याने वाढ होत असून चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पीपरी व श्रीरामनगर गावातील तरुणांना तसेच नागरिकांना रात्रगस्त ठेवून चोरीवर आळा घालण्यास सहकार्य करण्यासाठी डुग्गीपार पोलीसांच्यावतीने जनजागरण सभेच्या माध्यमातून आवाहन करण्यात आले.डुग्गीपार पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक केशव बावडे यांनी आपल्या सहकारी कर्मचार्यांना सोबत घेऊन आजुबाजूच्या प्रत्येक गावात रात्रीला जाऊन नागरिकांमध्ये कायद्याविषयी जनजागृती व पोलिसांना सहकार्य करुन अप्रवृत्तीपासून गावाचे रक्षण करण्यासाठी बैठका घेण्यास सुरवात केली आहे.त्यांच्या आवाहनाला नागरिकांनीही प्रतिसाद देत रात्रगस्त सुरु केल्या आहेत.संशयित व्यक्ती आढळल्यास डुग्गीपार पो.स्टेशनच्या 07199-233233 या क्रमांकावर माहिती देण्याचेही आवाहन केले आहे.