लाखनी येथे वक्तृत्व प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन

0
11

*स्वप्नपूर्ती फाउंडेशनचा उपक्रम ,चार दिवस चालणार कार्यशाळा

लाखनी,दि.25-वक्तृत्व कौशल्य हे माणसाच्या व्यक्तिमत्वाला खऱ्या अर्थाने खुलवते. विद्यार्थी, युवक यांच्यामध्ये वक्तुत्व, संभाषण कौशल्यांचा विकास व्हावा आणि उत्तम अष्टपैलू व्यक्तिमत्व घडावेत या दृष्टीने स्वप्नपूर्ती फाउंडेशनच्या वतीने लाखनी येथे व्यक्तिमत्व विकास व वक्तृत्व प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत व्यक्तिमत्व विकास, सूत्रसंचालन, वक्तुत्व विकास, नेतृत्व विकास, सादरीकरण व संभाषण कौशल्य आदी विषयांवर प्रशिक्षण व मार्गदर्शन देण्यात येणार आहे.ही कार्यशाळा  ४ जून ते ७ जून २०१७ दरम्यान चार दिवस चालणार आहे.या कार्यशाळेचे उद्घाटन माजी विक्रीकर उपायुक्त प्रकाश बाळबुद्धे यांच्या हस्ते आणि भंडारा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष  चेतन भैरम तथा कार्यशाळा संयोजक अंगेश बेहलपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. ज्येष्ठ कवि आणि ख्यातनाम वक्ते डॉ. संजय पोहरकर, प्रसिद्ध सूत्रसंचालक सुधन्वा चेटुले, नवोदित वक्ते प्रशांत वाघाये तसेच विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवर मंडळी मार्गदर्शन करणार आहे.
शिक्षक बांधव, शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी, नोकरदार वर्ग व इतर सर्व इच्छुकांनी या शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन शिबिर संयोजक अंगेश बेहलपांडे, स्वागताध्यक्ष आशा वनवे, सुधीर काळे, किशोर वाघाये, संजय वनवे, सुभाष गरपडे, विशाल हटवार, विवेक टिचकुले यांनी केले आहे.