१ लाख २७ हजार विद्यार्थी लाभार्थी : ३ लाख ५६ हजार पुस्तके

0
9

गोंदिया,दि.26 : सर्व शिक्षा अभियानांतर्गत सन २०१७-१८ या वर्षासाठी वर्ग १ ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना हिंदी, मराठी, इंग्रजी व उर्दू माध्यमांची सर्व पुस्तके मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे. जिल्ह्यातील १ लाख २७ हजार २३४ विद्यार्थ्यांसाठी ६ लाख ९७ हजार ९२७ पुस्तकांची मागणी करण्यात आली. आतापर्यंत ५१.८ टक्के पुस्तके म्हणजेचे ३ लाख ५६ हजार ५१६ पुस्तके उपलब्ध झाली.

सर्व शिक्षा अभियानांतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थेचे शिकणाऱ्या वर्ग १ ते ८ च्या सर्व विद्यार्थ्यांना पुस्तके मोफत दिली जातात. गोंदिया जिल्ह्यातील १ लाख २७ हजार २३४ बालकांना त्याच्या अभ्यासक्रमाची पुस्तके द्यायची आहे. यासाठी सर्व शिक्षा अभियानाने ६ लाख ९७ हजार ९२७ पुस्तकांची मागणी केली आहे.या पुस्तकासाठी २ कोटी ५२ लाख २० हजार ९९० रुपये लागणार आहेत. यापैकी ५१.८ टक्के पुस्तके म्हणजेच ३ लाख ५६ हजार ५१६ पुस्तके जिल्ह्याला पुरवठा करण्यात आली आहे. आतापर्यंत पुस्तकावर १ कोटी २५ लाख ९७ हजार ९०७ रुपये खर्च केले आहे.

जिल्ह्याला आणखी ३ लाख ४१ हजार ४११ पुस्तके लागणार आहेत. त्यासाठी १ कोटी २६ लाख २३ हजार ८३ रुपये लागणार आहेत. पुस्तकांसाठी सडक अर्जुनी तालुक्यासाठी १२ हजार ५९६ विद्यार्थ्यांसाठी ६७ हजार ६४२, अर्जुनी-मोरगाव तालुक्यासाठी १६ हजार ६६१ विद्यार्थ्यांसाठी ९१ हजार ६५१, देवरी तालुक्यासाठी १२ हजार ५३० विद्यार्थ्यांसाठी ६७ हजार ६६७, तिरोडा तालुक्यासाठी १७ हजार ६४ विद्यार्थ्यांसाठी ९४ हजार २२२, गोंदिया तालुक्यासाठी ३६ हजार ८४ विद्यार्थ्यांसाठी २ लाख ७२९, गोरेगाव तालुक्यासाठी ११ हजार ८४१ विद्यार्थ्यांसाठी ६४ हजार ४२, आमगाव तालुक्यासाठी ११ हजार ३८१ विद्यार्थ्यांसाठी ६२ हजार ४२४, सालेकसा तालुक्यासाठी ९ हजार ७७ विद्यार्थ्यांसाठी ४९ हजार ५५० पुस्तकांची मागणी करण्यात आली आहे. यंदा इयत्ता सातवीचा अभ्यासक्रम बदललेला आहे. २७ जून रोजी सर्व विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करून पुस्तक दिवस साजरा केला जाणार आहे. शाळा सुरू होण्याच्या पूर्वीच सर्व विद्यार्थ्यांसाठी पुरेशी पुस्तके उपल्बध करण्याचा माणस सर्व शिक्षा अभियानाचा आहे. यासाठी शिक्षा अभियानाचे कर्मचारी सतत पाठपुरावा करीत आहेत.