38.6 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ वृक्षारोपण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी -अंजली घोटेकर

वृक्षारोपण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी -अंजली घोटेकर

0
26

blank

चंद्रपूर,दि.08 : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वनविकास महामंडळ चंद्रपूरतर्फे रामबाग वनवसाहतीच्या प्रादेशिक कार्यालयात वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपण करणे हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे. त्यामुळे प्रत्येकानी यासाठी समोर यावे, असे आवाहन महापौर अंजली घोटेकर यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाव्यवस्थापक एस.एस.डोळे होते. प्रमुख अतिथी म्हणून मुख्य वनसंरक्षक तथा ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे संचालक जी.पी.गरड, चंद्रपूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक व्ही.एस.शेळके, महाव्यवस्थापक एम.सी.गणात्रा, एफडीसीएम लिमीटेड पश्चिम चांदाचे क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी तसेच चंद्रपूर परिक्षेत्रातील फायर वॉचर उपस्थित होते.

blank