मुंबई, दि. १७ : राज्यामध्ये प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत अपारंपरिक तंत्रज्ञान वापरुन ४८१ किलोमीटरची करण्यात आलेली कामे तसेच दर्जेदार व गुणवत्तापुर्ण करण्यात आलेली रस्त्यांची कामे आणि दिलेल्या रस्त्यांच्या लांबीचे उद्दिष्टही कालमर्यादेत करण्यात आले असल्याने देशात महाराष्ट्र राज्याला ग्रामसडक योजनेत उत्कृष्ट पुरस्कार जाहीर झाला असून दि. १९ जून रोजी केंद्रीय ग्राम विकास मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांच्या हस्ते विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे देण्यात येणार आहे.





