25.1 C
Gondiā
Saturday, August 8, 2026
Home Top News रूपेश मुळे नरबळी प्रकरणाचा निकाल २७ जूनला?

रूपेश मुळे नरबळी प्रकरणाचा निकाल २७ जूनला?

0
20

वर्धा,दि.18 : बहुचर्चीत रूपेश मुळे नरबळी प्रकरणाचा निकाल शनिवारी लागणार होता. या निर्णयाकडे  लक्ष असताना काही तांत्रिक अडचणीमुळे सदर निकाल तुर्तास टळला आहे. हा निकाल आता येत्या २७ जून रोजी देण्यात येणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.जिल्ह्यासह राज्याचे लक्ष असलेल्या रूपेश मुळे नरबळी प्रकरणात शासनाच्या व आरोपीच्या वकिलांकडून युक्तीवाद झाल्यानंतर केवळ निकालाची प्रतीक्षा सर्वांना लागली आहे. या प्रकरणात न्यायालयाकडून २१ साक्षदार तपासण्यात आले. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्याने शनिवारी निकाल येण्याची शक्यता होती; पण ऐनवेळी आलेल्या तांत्रिक अडचणीमुळे निकालाकरिता आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

blank