25 C
Gondiā
Thursday, August 13, 2026
Home राष्ट्रीय देश एनडीएचे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांचा राजीनामा

एनडीएचे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांचा राजीनामा

0
25
नवी दिल्ली, दि.  20 –  बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांनी आपल्या पदाचा मंगळवारी राजीनामा दिला आहे. राष्ट्रपतीपदासाठी भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून रामनाथ कोविंद यांना उमेदवारी देण्यात आली असून त्यांचा राज्यपालपदाचा राजीनामा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी स्वीकारला आहे. तसेच, पश्चिम बंगालचे राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांच्याकडे बिहारचा अतिरिक्त प्रभार दिला आहे.
रामनाथ कोविंद यांनी आज केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा केली. यावेळी राजनाथ सिंह यांनी त्यांना राष्ट्रपतिपदाचे उमेदवार म्हणून निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले. याबाबत राजनाथ सिंह यांनी ट्विट सुद्धा केले आहे.
blank