41.4 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home Top News टिप्परच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू, गावकऱ्यांनी टिप्पर पेटवला

टिप्परच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू, गावकऱ्यांनी टिप्पर पेटवला

0
26

blank

पवनी,दि.22 :भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात भरधाव वाळू् वाहून नेणार्या टिप्परने दिलेल्या धडकेत एका शाळकरी विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आसगाव जवळ घडली.अपघातानंतर संतप्त गावकऱ्यांनी टिप्परला थांबवत आग लावली.धडक देणारा  टिप्पर पेटवून गावकरी थांबले नाहीत, तर त्यांनी येणाऱ्या इतर वाळूच्या ट्रक व टिप्परचीही तोडफोड केली. आग विझवण्यासाठी आलेल्या अग्मिशमन दलाच्या वाहनाचीही तोडफोड करण्यात आली.या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र त्यांनाही ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले.नागरिकांनी या सर्व घटनेला लोकप्रतिनिधी,महसुल व पोलिस विभागातील वाळूमाफियाकडून लाच घेऊन ट्रक सोडणार्या अधिकार्यांविरुध्द रोष व्यक्त केला आहे.प्राची मांडावलकर असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव असून ती दहावीत शिकत होती. ट्यूशन क्लासवरुन परत येत असताना ट्रकच्या धडकेत तिचा मृत्यू झाला. प्राचीच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी अशी मागणी करत रास्ता रोको करण्यात आला.अद्यापही परिस्थिती घटनास्थळावर तणावाची आहे.

blank